…म्हणून अभिनेत्री नेहा धुपियाचं लग्न घाई-गडबडीत उरकण्यात आलं?

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्याच आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकली. कोणताही गाजावाजा न करता, लग्न झाल्यानंतरच नेहाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जाहीर केले. नेहा गर्भवती असल्यामुळे तिने दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगद बेदीसोबत लगीनगाठ बांधली, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नेहाचे वडील प्रदीप धुपिया यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘नेहा लग्नाआधी गरोदर असल्याच्या वृत्तात जरासंही तथ्य नाही. ‘नेहा आणि अंगद चांगले मित्र आहेत, हे आम्हाला माहित होतं. आपल्याला लग्न करायचं आहे, हे ते दोघं कधी सांगतात, याचीच आम्ही वाट पाहत होतो. त्यांनी निर्णय घेताच, आम्ही पालकांनीही लगेच संमती दिली’ असं नेहाच्या वडिलांनी सांगितलं.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)