म्युच्युअल फंड 50 लाख कोटींचा होणार

पाच वर्षांत गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढण्याची शक्‍यता

वितरकाचे कमिशन पारदर्शक हवे

फंडानी काही बाबतीत जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. फंड वितरकांना कमिशन कसे दिले जाते. त्याबाबत संदिग्धता राहता कामा नये. ती प्रक्रिया पारदर्शक करण्याची गरज आहे. काही वितरकांना मोबदला म्हणून परदेशी वाऱ्यावर पाठविले जाते. नियंत्रकानी असे प्रकार रोखण्याची गरज आहे. फंडानी स्वंयशिस्त बाळगली नाही तर नियंत्रकानी त्यांना धडे देण्याची गरज असल्याचे पारेख म्हणाले.

मुंबई: पुढील पाच वर्षांतच म्युच्युअल फंडाखालील मालमत्ता दुप्पट होऊन ती 50 लाख कोटी रुपयांची होणार असल्याचे मत जेष्ठ बॅंकर दीपक पारेख यांनी व्यक्‍त केले आहे. ते म्हणाले की, देशातील चांगले पगार असणाऱ्या तरुणांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर छोटे उद्योगही वाढत आहेत. या गुंतवणूकदारांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंड वेगाने वाढण्याची शक्‍यता आहे. भारतातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 11 टक्‍के आहे. तर जागतिक पातळीवर सर्वसाधारणे हे प्रमाण 62 टक्‍के आहे. त्यामुळे हा उद्योग वाढण्यास भारतात अमर्याद वाव असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, अगोदर वित्तीय उत्पादने उपलब्ध नव्हती, त्यामुळे लोक सोने किंवा रिऍल्टीत गुंतवणूक करीत होते. आता वित्तीय साधने उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणूकदारांना ओढा म्युच्युअल फंडासारख्या साधनाकडे वळू लागला आहे. त्यात बदल होण्याची शक्‍यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढतच जाण्याची शक्‍यता असल्याचे त्यांना वाटते.

पारेख म्हणाले की, काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात महिलांही समावेश आहे. मध्यम वर्ग वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर सरकार अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण करण्यासाठी विविध क्षेत्रात मोठ्या सुधारणा करीत आहे. सरकार बॅंकिंग कक्षेबाहेर असलेल्या लोकांना बॅंकिंग कक्षेते आणत आहे. इपीएफओचा निधी वाढत आहे. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गेल्या अडीच वर्षात हा उद्योग 86 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

मार्च 2016 मध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली केवळ 12.3 लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता होती आता त्या 23 लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षात त्या किमान 50 लाख कोटी होण्याची शक्‍यता आहे असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात फंडामध्ये झालेल्या अभूतपूर्व गुंतवणुकीत संस्थागत गुंतवणूकदार नाही तर किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)