म्युच्युअल फंडाबाबतचे समज-गैरसमज (भाग-2)

गेली सुमारे ५५ वर्षेम्युच्युअल फंडाच्या योजना कार्यान्वित असल्या तरीही त्याविषयीचे अनेक गैरसमज अजूनही संपलेले नाहीत. त्यातील प्रमुख गैरसमज आपण पाहू यात.

म्युच्युअल फंडाबाबतचे समज-गैरसमज (भाग-1)

म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासारखेच आहे –

म्युच्युअल फंडाच्या सगळ्याच योजना शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत. प्रत्यक्षात अनेक योजना शेअर बाजार तसेच रोखे अशा विविध ठिकाणी विविध टक्केवारीत गुंतवणूक करत असतात. अनेक योजना फक्त रोख्यांमध्येही गुंतवणूक करत असतात. याचाच अर्थ असा की, सर्व प्रकारच्या योजना गुंतवणूकदाराच्या विविध गरजांसाठी तसेच विविध जोखमीनुसार योजनांची निर्मिती केलेली असते.

कमी दराने उपलब्ध असणाऱ्या योजना गुंतवणुकीसाठी उत्तम –

सदर गैरसमज हा अनेक गुंतवणुकदारांमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही योजनेचे मूल्य (एनएव्ही) ही रुपये १० आहे, म्हणजे गुंतवणुकीसाठी उत्तम हा गैरसमज आहे. बहुतांशी वेळा रु. १० हे मूल्य योजनेच्या जन्माच्या वेळीच उपलब्ध असते. अशावेळी म्युच्युअल फंड कंपनीची गुंतवणूक क्षेत्रातील अनुभव, योजनेतील उद्दीष्टांबाबतची सखोल माहिती, बाजारात असणारी परिस्थिती या सर्वांचा आढावा घेऊनच अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

अशा योजनांमध्ये गुंतवणूक करताना निश्चितच आर्थिक सल्लागारच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करणे हितावह ठरते. कोणत्याही योजनेची एनएव्ही किंवा आजचे मूल्य हे भविष्यातील परतावा कमी किंवा जास्त देण्याचे आश्वासन देत नाही. योजनेचा परतावा हा फक्त योजनेच्या कामकाजावरच ठरत असतो.

म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खात्याची आवश्यकता असते –

कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्यसाठी डिमॅट खात्याची आवश्यकता असलीच पाहिजे असे नाही. गुंतवणूकदार प्रत्यक्षात योजनेची खरेदी स्वतः अर्ज भरूनही करू शकतो. योजनेच्या खरेदीसाठीचा अर्ज, आवश्यक गुंतवणुकीचा धनादेश व आवश्यक कागदपत्रांसोबत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सहजरित्या शक्य आहे.

वरील सर्व गैरसमजुती दूर झाल्यास कोणताही सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या योजना त्याच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी सहजरित्या घेऊ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)