म्युच्युअल फंडाबाबतचे समज-गैरसमज (भाग-1)

गेली सुमारे ५५ वर्षेम्युच्युअल फंडाच्या योजना कार्यान्वित असल्या तरीही त्याविषयीचे अनेक गैरसमज अजूनही संपलेले नाहीत. त्यातील प्रमुख गैरसमज आपण पाहू यात.

म्युच्युअल फंडाच्या योजना विविध पद्धतीने गुंतवणूदारांच्या अनेक उद्दिष्टाप्रमाणे परतावा देत आलेल्या आहेत. १९६४ पासून २०१८ पर्यंतच्या प्रवासात म्युच्युअल फंड उद्योगात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. आजही या गुंतवणूक व्यवसायाबाबत अनेक समज-गैरसमज सामान्य गुंतवणुकदारांमध्ये आहेत.

म्युच्युअल फंड योजनांचा जसजसा प्रचार व प्रसार होत आहे तसतसे याबाबातचे गैरसमज मागे पडू लागल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य गुंतवणूकदार अशा योजनांचा लाभ घेताना आपण पहात आहोत. आज आपण म्युच्युअल फंड योजनांसंदर्भातील काही प्रमुख गैरसमजांबाबत विचार करणार आहोत.

म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज असते –

हा फार मोठा गैरसमज सामान्य गुंतवणुकदारांमध्ये आजही आहे. कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फार मोठ्या रकमेची गरज असते, असे समजणे अतिशय अयोग्य आहे. गुंतवणूकदार मासिक गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी रु. ५०० या रकमेपासून गुंतवणुकीला सुरवात करू शकतो. यासाठी दरमहा सिस्टिमॅटिक प्लॅन म्हणजेच प्रचलित एसआयपीद्वारे गुंतवणूक शक्य आहे. एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान रु. ५००० गुंतवणूक करणे शक्य होते.

म्युच्युअल फंडाबाबतचे समज-गैरसमज (भाग-2)

सर्वाधिक मानांकित असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास खात्रीशीर चांगला परतावा मिळतो –

म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांचे मानांकन त्यांच्या आजपर्यंतच्या एकूण कामगिरीवर दिले जात असतात. याचा अर्थ असा नव्हे की, सदर मानांकित असलेल्या योजना भविष्यातही खात्रीशीर चांगलाच परतावा देतील. योजनांचा परतावा वेळोवेळी काळानुसार कमी किंवाजास्त होत असतो याची अनेक कारणे असू शकतात. यामुळेच आज ज्या योजनांना अत्यंत वरचे मानांकन आहे त्यांचे भविष्यातील कामकाज आजपर्यंतच्या कामकाजासारखेच असेल याची खात्री देता येत नाही. कोणतीही योजना निवडताना उत्कृष्ठ मानांकन असणाऱ्या योजनेचा विचार करणे ही प्रथम पायरी असू शकते. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने योजनेचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. अशावेळी आपला आर्थिक सल्लागार आपणास योग्य मार्गदर्शन करत असतो. अनेक बाबींचा विचार, झालेल्या बदलांचा विचार गुंतवणुकीपूर्वी करणे आवश्यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)