म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत होत आहे वाढ 

मुंबई: गेल्या 10 वर्षात भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ 12.5 टक्‍क्‍यांनी झाली. याच कालावधीत आशिया-पॅसिफिक भागाची वाढ 8 टक्‍क्‍यांनी झाल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स ऑफ इंडिया (अम्फी)ने अहवालात म्हटले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात भारतीय म्युच्युअल फंडची वाढ 17.33 टक्‍क्‍यांनी झाली. जुलै महिन्यात या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक 23.96 लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षभरात समभागांत चांगली तेजी दिसून आली. पारंपरिक गुंतवणुकीत कमी व्याजदर मिळत आहे आणि अम्फीकडून गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्याच्या प्रमाणात वाढ झाली. याव्यतिरिक्त एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
म्युच्युअल फंड क्षेत्राच्या माध्यमातून भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेन्टच्या माध्यमातून 2014 मध्ये गुंतवणुकीचे असणारे प्रमाण 8.5 टक्‍क्‍यांवरून 18.4 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. याविरोधात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीचे प्रमाण या कालावधीत 61.8 टक्‍क्‍यांवरून घसरत 56.4 टक्‍क्‍यांवर आले. गेल्या काही वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांमध्ये जागृती झाल्याने एकाचवेळी गुंतवणूक करण्यापेक्षा मासिक पद्धतीने केल्यास बचत होण्यास मदत होते याचे ज्ञान त्यांना झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)