म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मागोवा कसा घ्याल? (भाग-2)

प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या ठरवलेल्या उद्दिष्टानुसार केलेली गुंतवणूक नेमकी कशा पद्धतीने वाढत आहे याचा पाठपुरावा किमान वर्षातून एकदा तरी घेणे आवश्‍यक आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मागोवा कसा घ्याल? (भाग-1)

योजनेच्या फंड मॅनेजर बदलला असल्यास…
अनेक म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या योजना योग्य पद्धतीने चालवण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया व नियमावली ठरवून घेतात. जेणेकरून योजनेचा फंड मॅनेजर बदलला तरी योजनेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. योग्य वेळी योग्य क्षेत्रातील कंपन्यांची निवड गुंतवणुकीसाठी करणे हे निष्णात फंड मॅनेजरचे काम आहे. यातूनच वाढीव परतावा योजनेमध्ये मिळत असतो. जर योजनेमधील फंड मॅनेजर बदलले असता नवीन आलेल्या मॅनेजरचा मागील अनुभव कमी असेल तर योजनेच्या भविष्यातील परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

योजनेतील निवडलेल्या कंपन्यांच्या पद्धतीत झालेला बदल –
योजनेमध्ये प्रमुख दहा कंपन्यांच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. या योजनेचा मोठा भाग या दहा कंपन्यांमध्ये गुंतवलेला असतो. जर या प्रमुख दहा कंपन्यांमधील गुंतवणुकीमध्ये अचानक मोठे बदल करण्यात आले असतील तर त्यामागील कारणे तपासणे आवश्‍यक आहे. एकूण गुंतवणुकीचा मोठा भाग याठिकाणी गुंतवलेला असल्याने याठिकाणी झालेला बदल योजनेतील जोखीम वाढवणारा ठरू शकतो. याचा गुंतवणूकदाराने विचार करून गुंतवणूक सुरुच ठेवावी का, याचा परामर्श आपल्या आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करून घ्यावा.

डेट फंडात पैसे गुंतवलेल्या कंपनीची पत, पैसे दिलेला कालावधी, त्यावर मिळणारा परतावा व बाजारात या कंपन्यांची पैसे परत देण्याची मानांकन तपासणे आवश्‍यक आहे.

योजनेची सखोल माहिती कशी मिळवावी?
इक्विटी अथवा डेट म्युच्युअल फंडाबाबत सर्व माहिती प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. कंपनीच्या सगळ्या योजना, त्यांची उद्दिष्टे, संपूर्ण पोर्टफोलिओ, फंड मॅनेजरची माहिती, योजनेमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेचा आकडा, योजनेची सुरवात झाल्याची तारीख, योजनेच्या प्रत्येक कालावधीत मिळालेला परतावा इत्यादी माहिती उपलब्ध असते.
या संदर्भात अनेक संकेतस्थळांवर ही माहिती उपलब्ध असते. उदा. www.moneycontrol.com अथवा www.valueresearch.com सारख्या अनेक संकेत स्थळांवर म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांची माहिती दिलेली असते. प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या ठरवलेल्या उद्दिष्टानुसार केलेली गुंतवणूक नेमकी कशा पद्धतीने वाढत आहे याचा पाठपुरावा किमान वर्षातून एकदा तरी घेणे आवश्‍यक आहे. ज्याप्रमाणे स्वास्थ चांगले राहण्यासाठी आपण योग्य अशा डॉक्‍टरांचा सल्ला घेतो, कायदेशीर बाबींसाठी योग्य अशा वकिलांचा सल्ला घेतो तसेच गुंतवणुकीतील अपेक्षित परताव्यासाठी योग्य योजनेची निवड करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)