म्युच्युअल फंडाची घौडदौड

ऑगस्टमध्ये व्यवस्थापनाखालील मालमत्ता 25 लाख कोटी रुपयांवर

मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरातील किरकोळ गुंतवणूकदारांकडूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढू लागली आहे. याबाबत देशभर सुयोग्य वातावरणनिर्मिती झाली आहे. बाजार नियंत्रक सेबी या घडामोडीकडे लक्ष देत आहे. या कारणामुळे गेल्या तीन वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
– एन एस व्यंकटेश,
मुख्य कार्यकारी अधिकारी, ऍम्फी

नवी दिल्ली: शेअरबाजार निर्देशांक आणि रुपया कमी होत असतानाच म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मात्र झपाट्याने वाढत आहे. ऑगस्टअखेर म्युच्युअल फंडाखालील मालमत्ता 25 लाख कोटींवर गेली असल्याची माहिती फंडांची संघटना असलेल्या ऍम्फी या संस्थेने दिली आहे.

एका महिन्यातच या मालमत्तेत 8.41 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. अम्फीने म्हटले आहे, की किरकोळ गुंवणूकदारांकडून मोठया प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. फंडांनी आणि फंडांच्या संघटनेने चांगली वातावरणनिमिती केल्यामुळे फंडांकडे गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे या संघटनेला वाटते. जुलैमध्ये फंडाच्या नियंत्रणाखालील मालमत्ता 23.06 कोटी रुपये इतकी होती. देशात सध्या 42 फंड कंपन्या आहेत. गेल्या वर्षी फंडाकडे 20.6 लाख कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनासाठी होती.

सीप ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना फार आवडत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना शेअरबाजारातील चढउताराकडे लक्ष देण्याची गरज पडत नाही. ऑगस्ट 2017 मध्ये फंडाकडील मालमत्ता 20 लाख कोटी रुपये होती. तर मे 2017 मध्ये फंडाकडील मालमत्ता केवळ 10 लाख कोटी रुपये इतकी होती.

फंडाबाबत किरकोळ गुंतवणूकदारांत सकारात्मक वातावरण निर्मीती होत आहे. त्याचबरोबर फंडाच्या कामकाजाकडे सेबी लक्ष ठेवून आहे. शिवाय स्थूल अर्थव्यवस्था उत्तम असल्यामुळे आगामी काळातही या क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणूक वाढविण्याची शक्‍यता आहे. एकीकडे म्युच्युअल फंडातील गुंतवणुक वाढत असताना सोने आणि रिऍल्टी क्षेत्रातील गुंतवणूक मात्र गेल्या काही वर्षापासून कमी होत असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)