म्युच्युअल फंडाकडील ओघ कायम! (भाग-१)

देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्याकडे असलेल्या गुंतवणूकदारांच्या खात्यांच्या संख्येत ऑक्टोबर 2018 या महिन्यात 11.45 लाखांनी वाढ झाली. त्यामुळे एकूण खात्यांची संख्या 7.90 कोटी इतकी झाली आहे. भारतातील म्युच्युअल फंडाच्या इतिहासातील ही खात्यांची सर्वोच्च संख्या आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड (अॅम्फी) या म्युच्युअल फंडांच्या महासंघाने दिली आहे.

म्युच्युअल फंडाकडील ओघ कायम! (भाग-२)

-Ads-

गुंतवणूकदारांच्या ओळखीसाठी खात्याला क्रमांक दिले जातात आणि एका गुंतवणूकदारांची अनेक खाती असू शकतात. असे असले तरी वाढती खाती म्हणजे म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याचे चिन्ह आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत छोट्या शहरांमधील नव्या गुंतवणूकदारांचा इक्विटी संबंधित फंड योजनांकडे मोठा ओढा असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात समाविष्ट झालेल्या खात्यापैकी 10.6 लाख खातेदारांनी इक्विटी योजना, बॅलन्स्ड फंड आणि प्राप्तीकर सवलत देणाऱ्या इक्विटी लिंक्ड (ईएलएसएस) योजनांना पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील खातेदारांपैकी जवळपास 93 टक्के खातेदारांनी या योजनांची निवड केलेली आहे. याच महिन्यात इन्कम फंड आणि गोल्ड ईटीएफमधील खाती कमी झाल्याचे दिसून आले आहे.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)