म्युच्युअल फंडाकडील ओघ कायम! (भाग-२)

म्युच्युअल फंडाकडील ओघ कायम! (भाग-१)

ऑक्टोबर महिन्यातील वाढलेली खाती आणि म्यच्युअल फंड योजनांची निवड करण्याची गुंतवणूकदारांची पद्धत पाहिली असता नव्या गुंतवणूकदारांमधील भिती कमी होऊन दीर्घकाळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्वाधिक आश्वासक असल्याचे आणि त्यामध्ये लवचिकता असल्याची बाब त्यांच्या लक्षात येऊ लागली आहे.

स्वीप इन एफडी

अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठी रक्कम मुदती ठेवीमध्ये (एफडी) मध्ये ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे बचत खात्यातील रक्कम तशीच पडून ठेवली जाते. पण ही रक्कम तुम्ही स्वीप-इन एफडीद्वारे मुदत ठेवीमध्ये गुंतवू शकता. स्वीप-इन एफडी सुविधेअंतर्गत तुम्ही ठरवलेल्या रकमेपेक्षा तुमच्या बचत खात्यातील रक्कम जास्त झाली की, ती जास्त झालेली रक्कम आपोआप मुदत ठेवीमध्ये परावर्तित होते. नंतर समजा तुमच्या बचत खात्यातील रक्कम कमी झाली आणि तुम्ही खात्यातून रक्कम काढण्यासाठी गेला किंवा कुणाला धनादेश दिला तर आवश्यक ती रक्कम एफडीतून लगेचच खात्यामध्ये वर्ग होते आणि उरलेल्या मुदत ठेवीला धक्का लागत नाही. स्वीप-इन एफडीसाठी मुदतीचा पर्याय निवडता येतो. साधारणपणे बँका स्वीप इन एफडीसाठी 12 महिन्यांची मुदत निश्चित करतात. त्या परिस्थितीत मुदत संपण्यापूर्वी ठेव काढल्यास व्याजावर 0.5 ते 1 टक्क्यापर्यंत पेनल्टी भरावी लागू शकते.

स्वीप-इन एफडीवरील परतावा हा नेहमीच्या एफडीइतकाच असतो आणि लागू असलेल्या कररचनेनुसार परताव्यावर कर भरावा लागतो. रु. दहा हजारांपेक्षा जास्त परतावा असेल तर बँक टीडीएस कापून घेते.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)