म्यानमार मध्ये पुन्हा वांशिक हिंसाचार

हजारो लोकांनी केले पलायन
यंगोन –  म्यानमारच्या उत्तर भागात पुन्हा वांशिक बंडखोर आणि लष्करी जवानांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर किमान चार हजार लोकांनी तेथून पलायन केले असल्याचे वृत्त आहे. अति उत्तरेकडील कचिन राज्याच्या सीमावर्ती भागात हा हिंसाचार झाला. वांशिक बंडखोरांनी तेथील लष्करावर हल्ले चढवल्यानंतर लष्कराने त्यांच्यावर आक्रमकपणे, कारवाई केली.

कचिन इंडिपेंडेंट आर्मी आणि म्यानमारचे लष्कर यांच्यात सन 2011 पासून या भागात चकमकी सुरू आहेत. या चकमकीमुळे या वर्षाच्या सुरूवातीलाच या भागातून सुमारे पंधरा हजार जणांनी येथून पलायन केल्याचे सांगण्यात येते. बंडखोर आणि लष्करातील चकमकीमुळे अजूनही या भागात अनेक नागरीक अडकून पडले आहेत. त्यातील महिला आणि मुलांची आम्हाला चिंता असून त्यांनाबाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गनिमीव व बंडखोरांच्या गटांना त्यांच्या भागात अधिक स्वायत्तता हवी असून त्यासाठी ते लढत आहेत.

म्यानमार मधील लष्करी राजवटीनंतर त्यांच्या प्रश्‍नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती पण तसा तोडगा अद्याप निघू शकलेला नाही त्यामुळे या भागातील अशांतता वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)