वॉशिंग्टन – रोहिंग्य मुस्लिम गनिमांनी म्यानमार मध्ये हिंदुंचे मोठे हत्याकांड घडवले असून या प्रकरणाची माहिती ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात देण्यात आली आहे. ही माहिती धक्‍कदायक असून या प्रकरणाच्या स्वतंत्र आणि सविस्तर चौकशीची गरज आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. या अहवालाने आम्ही चिंतीत झालो असून या हत्याकांडाची जबाबदारी निश्‍चीत धरून संबंधीतांवर कठोर कारवाईची गरज आहे असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. अमेरिककडून या चौकशीला पुर्ण मदत दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात या हत्याकांडाचा जो तपशील नमूद झाला आहे, त्यात म्हटले आहे की 25 ऑगस्ट 2017 रोजी अर्कान रोहिंग्य साल्वेशन आर्मी या रोहिंग्य मुस्लिमांच्या गनिमांनी अह नौक खा माउंग सेईक या गावातील हिंदुच्या वसतीवर हल्ला करून तेथील हिंदुच्या महिला आणि लहान मुलांची त्यांनी सर्रास कत्तल केली. त्यात एकूण 99 जण ठार झाले. या अहवालामुळे भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या 60 हजार रोहिंग्य मुस्लिमांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.

रोहिंग्य मुस्लिमांनी म्यानमार मध्ये यापुर्वी बौद्धांवरही हल्ले केल्यानंतर बौद्धांनी तसेच म्यानमार च्या लष्कराने रोहिंग्य मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करून त्यांना देशाबाहेर पलायन करायला भाग पाडले आहे. त्यामुळे सध्या सात लाख रोहिंग्य मुस्लिम निर्वासित म्यानमार मध्ये राहु लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)