म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या परतण्याविरोधात आंदोलन 

सित्तवे (म्यानमार): बांगलादेशातून म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या परत येण्याविरोधात म्यानमारच्या रखाईन प्रांतात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले आहे. हे रोहिंग्या पळून गेलेले शरणार्थी असल्याने त्यांना पुन्हा म्यानमारमध्ये स्थान देण्यात येऊ नये अशा मागणीसाठी स्थानिक बौद्ध धर्मगुरुंच्या नेतृत्वाखाली रखाईनची राजधानी सित्तवे येथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. देशाच्या सुरक्षिततेला जपण्यासाठी देशातील सर्वच लोकांवर जबाबदारी आहे.

या बंगालींना आम्ही स्वीकारले तर आमच्या देशाला किंवा आम्हालाही काहीही फायदा होणार नाही, असे या मोर्चातील एका साधूने “फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून बोलताना सांगितले. बांगलादेश आणि म्यानमारने रोहिंग्यांच्या माघारीला सुरुवात करण्यास पाठिंबा दिल्याच्या 10 दिवसांनी हे आंदोलन सुरू झाले आहे.

-Ads-

गेल्यावर्षी 7 लाख रोहिंग्या रखाईन प्रांतातून बांगलादेशात शरणार्थी म्हणून स्थलांतरीत झाले होते. म्यानमारचे सैन्याने रोहिंग्यांवर अत्याचार करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्यानमारमध्ये परत आल्यानंतर सुरक्षित राहू दिले जाणार नाही आणि पुन्हा अत्याचार केले जातील, अशी भीतीही रोहिंग्यांकडून व्यक्‍त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)