म्यानमारच्या अध्यक्षपदी विन मिन्ट यांची निवड

नायपिदॉ (म्यानमार) – म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांचे समर्थक विन मिन्ट यांची आज देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष हितीन क्‍यॉ यांनी विश्रांतीच्या कारणास्तव गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदासाठी संसदेमध्ये आज मतदान झाले. अध्यक्षपदी मिन्ट यांची निवड झाल्यामुळे धेयधोरणांवर स्यू की यांची पकड अधिकच घट्ट होणार आहे.

विन मिन्ट यांनी गेल्या आठवड्यात म्यानमारच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. संसदेमध्ये झालेल्या मतदानात मिन्ट यांना दोन तृतीयांश मते मिळाली. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाचे संसदेत प्राबल्य असल्याने मिन्ट यांची निवड जवळपास निश्‍चित होती. त्यांच्याविरोधात लष्कराच्या पाठिंब्यावर प्रभारी अध्यक्ष म्यिंट स्यु यांनी निवडणूक लढवली होती.

स्यू की यांचा विवाह विदेशी व्यक्‍तीबरोबर झाला आहे. तसेच त्यांची दोन्ही मुले ब्रिटीश नागरिक आहेत. लष्करी राजवटीमध्ये राज्यघटनेत झालेल्या फेरबदलामुळे स्यू की या देशाच्या अध्यक्ष बनू शकणार नाहीत. म्यानमारमध्ये 2015 साली झालेल्या निवडणूकीत स्यू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर त्यांच्यासाठी स्टेट कौन्सेलर हे नवीन पद निर्माण करण्यात आले होते. या पदाला कोणतीही घटनात्मक भूमिका नाही. पण हे पद अध्यक्षांपेक्षाही वरचढ असल्याचेही घोषित करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)