म्यानमारकडून रोहिंग्यांच्या गावांमध्ये सैन्यतळाची उभारणी

लंडन :  म्यानमारकडून पलायन केलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा देशात वसवण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी  असे घडणे अशक्य मानले जात आहे. म्यानमार कथितरित्या रोहिंग्या मुस्लिमांच्या गावांमध्ये सैन्यतळांची उभारणी करत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या हिंसाचारानंतर या गावांना पेटवून देण्यात आले होते.

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने सोमवारी विस्तृत उपग्रहीय छायाचित्रे प्रसिद्ध केली. यात जळालेल्या गावांची जागा आता नव्या सैन्यतळांनी घेतल्याचे दिसून येते. रोहिंग्यांच्या विरोधात म्यानमार सैन्याच्या मोहिमेला संयुक्त राष्ट्राने वंशविच्छेद ठरविले होते.

-Ads-

रखाइन प्रांताची पुनर्निर्मिती अत्यंत गोपनीय पद्धतीने होत आहे. प्रशासनाने विकासाच्या नावावर वंशविच्छेदाच्या मोहिमेला बळ देऊ नये असे विधान ऍम्नेस्टीच्या आपत्ती प्रतिसाद विषयक संचालिका तिराना हसन यांनी केले आहे. ऍम्नेस्टीच्या नव्या छायाचित्रांच्या अध्ययनातून रखाइनमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 3 सैन्यतळ निर्माण करण्यात आल्याचे आणि अनेक ठिकाणी सैन्यतळाचे काम सुरू असल्याचे स्पष्ट होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)