मौल्यवान वस्तूंचे “सुरक्षाकवच’ आणि नियम (भाग-२)

मौल्यवान वस्तूंचे “सुरक्षाकवच’ आणि नियम (भाग-१)

टीव्ही-फ्रिज सुरक्षित ठेवा
रेंटल इन्शुरन्स किंवा हाऊसहोल्डर पॉलिसी घेऊन महागडे सामान, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू यासारख्या दैनंदिन वस्तूंना आपण विमा कवच देऊ शकतो. हे विमा कवच आपल्या सामानाला हानीपासून बचाव करण्याबरोबरच चोरी किंवा घातपाताच्या जोखमीपासून देखील वाचवते. याप्रमाणे विमा कवच देण्यासाठी महागड्या वस्तूंचा विमा हा रिप्लेसमेंट व्हॅल्यूवर उतरवावा. उदा. जर आपल्या घरातील टीव्हीची किंमत बाजारात 50 हजार रुपये आहे आणि त्याचे डेप्रिशिएटेड मूल्य 30 हजार रुपये आहे तर आपल्याला विमा रिप्लेसमेंट मूल्य म्हणजेच 50 हजारांवर घेतले पाहिजे. अशा स्थितीत आपल्या टीव्हीचे नुकसान होत असेल तर विमा कंपनी त्याची भरपाई करून देईल. याखेरीज दागिन्यांचा विमा उतरवणे अत्यंत गरजेचे आहे.

-Ads-

सुवर्ण विमा बॅंक
लॉकरमध्ये असलेले दागिने चोरीला गेले किंवा अन्य कारणाने त्याची हानी झाल्यास त्यास विमा कवच प्रदान केले जाते. अनेक विमा कंपन्या पेहराव केलेल्या दागिन्यांचा देखील विमा उतरवते. यासाठी आपल्याला तक्रार दाखल करावी लागते किंवा चोरीचा पुरावा सादर करावा लागतो. यानंतर कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेक्षण करतात आणि त्यानुसार दागिन्यांचे मूल्य निश्‍चित केले जाते. अनेक कंपन्या घोषित मूल्यांवर विमा प्रदान करते, मात्र त्याचा हप्ता अधिक असतो.

सावध राहा
– जर घरातील मोलकरीण एखाद्या सामानाची चोरी करत असेल तर विमा कंपन्या दावा फेटाळून लावू शकतात. कारण मोलकरणीला घराचा सदस्य म्हणून ओळखले जाते.
– जर घर विमा कंपनीला माहिती न देताच दोन महिन्यांपर्यंत रिकामे राहत असेल आणि यादरम्यान चोरीची घटना झाली असेल तर विमा कंपनीकडून दावा नामंजूर केला जातो.
– जर कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून किंवा मालकाकडून नुकसान होत असेल तर विमा कंपनी हानीची जबाबदारी स्वीकारत नाही.
– दागिन्यांसंदर्भात विम्याचा दावा करताना कंपन्या संबंधित दागिन्याची खरेदी पावतीची मागणी करते. त्यामुळे आपण खरेदीच्या पावत्या जपून ठेवणे आवश्‍यक आहे.
– मोबाईल विम्यात फोन बदलण्याचा किंवा दुरुस्तीचा पर्याय असतो. प्लॅन घेताना आपल्याला कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, ते पडताळून पाहवे.

– अपर्णा देवकर 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)