मौलाना आझाद शिष्यवृत्तीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजाच्या गुणवंत मुला-मुलींसाठी ‘एमफील व पीएचडी’ या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षात ३ हजार २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती मिळविली असून राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातील ४५० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली असून या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो तर पश्चिम बंगालमध्ये ३२४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)