मौलवी असल्याचे सांगून तरूणीवर बलात्कार करणारा अटकेत

पुणे- मौलवी असल्याचे सांगून कुटुंबासोबत झालेल्या ओळखीचा आणि विश्‍वासाचा फायदा घेऊन 19 वर्षीय तरूणीला शिकविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
युनिस हासिम शेख (50, रा. सुवर्णयुग मंडळाजवळ, जनता बेकरी पाठीमागे,पर्वती) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरूणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 नोव्हेंबर 2017 पासून आजपर्यंतच्या कालावधीत पर्वती येथील सुवर्णयुग मंडळाजवळ जनता बेकरीच्या पाठीमागे आणि इतर ठिकाणी घडला. पीडित तरूणीही एकोणीस वर्षीय असून ती सध्या शिक्षण घेते. तर युनिस शेख याची कुंटुंबियासोबत ओळख होती. याच फायदा घेवून त्याने तरूणीला शिकविण्याचे आमिष त्याने दाखवले. तिच्याकडून त्याने तिची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली. ती कागदपत्रे तरूणीला न देता स्वतःच्या ताब्यात ठेवून ती नष्ट करण्याची धमकी देऊन तिचे, तिच्या आई-वडीलांचे बरे-वाईट करण्याचीही धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिचे अश्‍लिल चित्रीकरण करून आयुष्य खराब करण्याची धमकी दिली. तसेच त्याने तिच्यावर पर्वती येथील राहत्या घरात, हडपसर, दादर आणि मुंबई येथील व्हाईट हाऊस येथे वारंवार बलात्कार केला. तिला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने इतर साथीदारांचीही मदत घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)