मोही येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा पाणी प्रश्‍नावार संवाद

मोही ः ग्रामस्थांशी संवाद साधताना अनिल देसाई, समवेत डॉ. उज्वलकुमार काळे.

दहिवडी, दि. 5 प्रतिनिधी ः संपूर्ण माण तालुक्‍यात सलग तीन वर्षानंतर एक ते दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट होतो. आता माणच्या पूर्व भागातील 16 गावांचा पाणीप्रश्‍न भाजपने निकालात काढला आहे. उत्तर भागातील मोही-मार्डीसह 32 गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. यासंदर्भात ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठक होणार आहे, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी सांगितले.
मोही येथे ते ग्रामस्थांशी बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वलकुमार काळे, शिवाजी पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले, दुष्काळी माण-खटावमधील पूर्व भागातील 16 गावांचा पाणीप्रश्‍न सोडविला असून आता उत्तर भागातील पाणीप्रश्‍न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वास्तविक, धोम-बलकवडीच्या निर्मितीवेळी मोही-मार्डी गावांचा समावेश पाणी योजनेत होता. मात्र, नंतरच्या काळात दुदैवाने यादीतून ही गावे वगळली गेली.मात्र आता या सगळ्या गावांचा समावेश केला जाईल . लवकरच ना. चंद्रकांतदादा पाटील व ना. गिरीश महाजन यांच्यासमवेत मंत्रालय स्तरावर बैठक होईल त्यात पाणीप्रश्‍नावर चर्चा करण्यात येईल. धोम-बलकवडी किंवा जिहे-कटापूर योजनेमध्ये या गावांचा समावेश करण्यासंदर्भात पावले उचलली जातील.
दुष्काळी परिस्थिती सरसकट नाहीशी करण्यासाठी संबंधित गावांचा उपसा योजनेत समावेश होणे गरजेचे आहे. पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी तो करु. परंतु, उत्तर भागातील पाणीप्रश्‍न कायमचा निकालात काढू, असे ही ते म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)