मोहित कंबोज आयबीजेएचे नवे अध्यक्ष

उपाध्यक्षपदी सौरभ गाडगीळ आणि पृथ्वीराज कोठारी

मुंबई -इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोहित कंबोज यांची निवड केली आहे.

-Ads-

1919 मध्ये आयबीजेएची स्थापना करण्यात आली आणि ही कंपनी लवकरच शंभर वर्षे जुनी कंपनी बनणार आहे. निवृत्ती घेणारे अध्यक्ष मुकेश मेहता यांनी मोहित कंबोज यांचे नाव सुचवले. मोहित कंबोज हे त्यांच्या नेतृत्वगुणासाठी ओळखले जातात. त्यांना सराफ समुदायांसोबतच ज्वेलर्स समुदाय, रिफायनर्स यांनी पाठिंबा दिला आहे.

कंबोज म्हणाले की, संपूर्ण बुलियन व ज्वेलरी समुदायाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी माझे काम अधिक परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे करेन. आयबीजेएने सरकारसमोर या क्षेत्राचे वास्तववादी आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व सादर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. याच बैठकीमध्ये एकमताने कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज कोठारी व सौरभ गाडगीळ या दोघांची देखील निवड करण्यात आली.

आयबीजेए या क्षेत्रात सरकारसमोर प्रतिनिधित्व करण्यासोबतच प्रामाणिक मते मांडण्यासाठी ओळखली जाते. 2012 मध्ये पहिल्यांदा मोहित कंबोज यांची निवड झाली होती. आयबीजेए सोन्याचे दर हे दागिन्यांसाठी कर्ज सुविधा देणारे आरबीआयचे बेंचमार्क दर म्हणून ओळखले जातात. आयबीजेएचे गोल्ड दर हे सरकारने जारी केलेल्या स्वतंत्र सुवर्ण रोख्यांसाठीही बेंचमार्क आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)