मोहरम, गणेशोत्सवानिमित्त नियोजनबद्ध आराखडा तयार करून कृती

रंजनकुमार शर्मा ः जिल्हा पोलीस प्रशासनाचा प्रथमच महासंचालकांकडून पत्र देऊन गौरव
नगर – शहरात मोहरम व गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडले. हे दोन्ही सण उत्साहात पार पाडण्यासाठी मी नाही तर पोलीस अधिकारी व माझ्या सर्व सहकार्यांनी मोठे परिश्रम घेतले. स्वयंसेवकांचेही यामध्ये मोठे योगदान दिले आहे. कायद्याचे जो पालन करील, प्रशासन त्याचा निश्‍चितच गौरव करील. नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले. याबद्दल पोलीस महासंचालक दत्ता पडसलीकर यांनी पत्र पाठवून गौरव केला आहे. एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवता आली. जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सणापूर्वीच नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याप्रमाणे कृती करण्यात आली, असे प्रतिपादन जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी केले.
अ.नगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोहरम व गणेशोत्सव कायद्याचे पालन करणाऱ्या मंडळे व यंग पार्ट्यांचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कॅप्टन वर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, शहर, उपशहर अधीक्षक संदीप मिटके, उपायुक्त नायर, पो.नि. नितीन गोकावे, संतोष शिंदे, विनोद चव्हाण, संदीप पाटील, आदी उपस्थित होते.
शर्मा पुढे म्हणाले की, मोहरमचा बंदोबस्त दिवसा व रात्रीही द्यावा लागतो. मोहरम व गणेश उत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत आल्याने पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा व अतिरिक्त कामाचा मोठा ताण होता. मात्र, पोलीस प्रशासनाने कुठेही न डगमगता वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अनेकांना उत्सवादरम्यान प्रवेश बंदी होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. नियोजन सर्व वरिष्ठांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. विविध यंग पार्ट्या व मंडळे यांनीही चांगले सहकार्य केले, असे ते म्हणाले.
अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना म्हणाले की, कुठलेही काम सर्वांच्या सहकार्याशिवाय आपण पार पाडू शकत नाही. नियोजनबद्ध आराखडा केल्यास आपण हे करू शकतो. जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन्स, डीएचबी, गोपनीय शाखा, महसूल खाते, स्वयंसेवक, होमगार्ड, शांतता कमिटी सदस्य, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळ, यंग पार्ट्या यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन काळापहाड यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)