मोहम्मद शमी पूर्णत: निर्दोष -मोहम्मद भाई

नवी दिल्ली: भारतीय संघाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यात सुरु असलेल्या वादात मोठा खुलासा झाला आहे. लंडनमध्ये राहात असलेल्या मोहम्मद भाईने शमीवरील मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले आहेत. तसेच शमी पूर्णत: निर्दोष  असून मॅच फिक्सिंगशी माझा किंवा शमीचा काहीही संबंध नसल्याचे मोहम्मद भाईने एका मुलाखतीत म्हटले आहे. मात्र शमी आणि त्याच्या पत्नीला मी इंग्लंडमध्ये भेटलो होतो, अशी कबुली मोहम्मद भाईने दिली.

मी क्रिकेटचा चाहता आहे. जग जसे शमीला ओळखते, तसेच मी सुद्धा त्याला ओळखतो. इंग्लंडमधील कोणत्यातरी एका सामन्यादरम्यान शमीची आणि माझी ओळख झाली होती, असे मोहम्मद भाई म्हणाला. इतकेच नाही तर शमी एक चांगला माणूस आहे. शमी आणि त्याची बायको इंग्लंडमध्ये आले होते तेव्हा मी वेळात वेळ काढून त्यांना लंडन फिरून दाखवले होते, त्यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांना विमानतळावर सोडायलाही गेलो होतो, अशी सगळी माहिती मोहम्मद भाईने दिली.

माझ्यावरील मॅच फिक्सिंगचे आरोप चुकीचे आहेत. मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहात असलो, तरीही माझ्या शरिरात भारताचंच रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी तिरंगा कधीही झुकू देणार नाही, असे मोहम्मद भाई म्हणाला. मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बाबत मोहम्मद भाईला विचारलं असता, मी अशा नावाच्या कोणत्याही मुलीला ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी हे नाव पहिल्यांदाच मीडियातून ऐकल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)