मोहम्मद शमी पुन्हा परतला क्रिकेटच्या मैदानात!

मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पत्नीच्या आरोपानंतर चांगलाच अडचणीत आला आहे. कोलकाता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे शमीवर आता अटकेची टांगती तलवार आहे. मात्र अशा परिस्थितीतही तो क्रिकेटच्या मैदानावर सराव करताना दिसत आहे.

सर्व वादांना मागे टाकत त्याने पुन्हा एकदा तयारी सुरु केली आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमात तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. या मोसमाची सुरुवात 7 एप्रिलपासून होत आहे. त्यामुळे आयपीएलच्या तयारीसाठी मोहम्मद शमीकडे अत्यंत कमी कालावधी उरला आहे. या परिस्थितीमध्येही क्रिकेटच्या मैदानात उतरुन त्याने पुन्हा एकदा तयारी सुरु केली.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोहम्मद शमी गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर कौटुंबीक अत्याचारासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीचे इतर तरुणींशी शारीरिक संबंध आहेत, याची तक्रारही तिने केली. शिवाय शमीवर तिने मॅच फिक्सिंगचा आरोपही केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)