मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचे समन्स

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण  त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांवरुन शमीला सुरुवातीला क्लिन चीट मिळाली. मात्र त्यानंतर घरगुती हिंसाचारप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत कोलकाता पोलिसांनी शमीला समन्स बजावले आहे. उद्या शमीला कोलकाता पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.

कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयला पत्र लिहून, शमीच्या आयपीएलमधील आगामी वेळापत्रकाविषयी माहिती मागवलेली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीचे अन्य मुलींसोहत अनैतिक संबध असल्याचा आरोप करत, शमीने बुकींकडून पैसे स्विकारल्याचाही आरोप केला होता. मात्र बीसीसीआयच्या भ्रष्ट्राचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हसीन जहाँच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळले नाही.

यानंतर बीसीसीआयने शमीचा राखून ठेवलेला करार कायदेशीर पद्धतीने करत त्याला आयपीएलमध्येही खेळण्याची परवानगी दिली. मात्र यानंतर हसीन जहाँने कोलकाता पोलिसांमध्ये शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सध्या कोलकाता पोलिस प्रकरणात पुढचा तपास करत आहेत. सध्या मोहम्मद शमी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळतो आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)