मोहम्मद शमीच्या कारचा अपघात, डोक्‍याला गंभीर जखम

देहरादून – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्‍याला दहा टाके पडले आहेत. देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली.

शमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत सरावासाठी गेला होता. सराव करुन दिल्लीला परतत असतानाच ही घटना घडली. देहरादून हे शमीचे आवडते ठिकाण आहे. कौटुंबीक जीवनात ताण असल्याने तो सावरण्यासाठी देहरादूनला जाणे पसंत करत आहे. मोहम्मद शमी यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र आयपीएलपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)