मोहम्मद शमीची विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली

नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला क्लीन चीट देत आपल्या करारामध्ये सामील करून घेतले होते. पण बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला शमीने आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शमीचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याचा खेळ यांचा काहीही संबंध नाही, असे बीसीसीआयने यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शमीला मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर शमीने आपण असे काहीही केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर भ्रष्टाचारविरोधी पथकाने काही गोष्टींची चौकशीही केली. त्यामध्ये शमी दोषी नसल्याचे त्यांना आढळले आणि त्यामुळेच त्याला क्लीन चीट देण्यात आली.

एका वृत्तसमूहाने आपल्या सूत्रांच्या माध्यमातून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ” बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शामीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यांबद्दलही काही प्रश्न विचारले. यामध्ये आपले एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत, हे शमीने मान्य केले आहे. त्याचबरोबर या मैत्रिणीला आपण दुबईमध्ये भेटलो होतो, यावृत्तालाही दुजोरा दिला  असल्याचे वृत्तसमूहाच्या सूत्रांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)