मोहम्मद अनास आणि राजीव अरोकिया उपान्त्य फेरीत

आशियायी स्पर्धेतील ऍथलेटिक्‍स स्पर्धांच्या पहिल्याच दिवशीच्या खेळात भारतीय खेळाडूंनी आपली मोहोर उमटवायला सुरुवात केली आहे. भारताच्या मोहम्मद अनास आणि राजीव अरोकिया यांनी पात्रता फेरीत चमकदार कामगिरी नोंदवताना उपान्त्य फेरी गाठली. ज्यात अनासने केवळ 45.63 सेकंद वेळ नोंदवताना गटात अव्वल स्थान मिळवले. तर राजीवने 46.82 सेकंद वेळ देताना उपान्त्य फेरीत स्थान मिळवले.

दरम्यान कतारच्या मोहम्मद अब्बासने 45.81 सेकंदात अंतिम रेषा ओलांडताना दुसरे स्थान पटकावले, तर श्रीलंकेच्या कलिंगा कुमारागे याने 45.99 सेकंदात तिसरा क्रमांक निश्‍चित केला. दुसरीकडे भारताच्या चेतन बालसुब्रह्मण्यमने 2.15 मीटर झेप घेताना पुरुषांच्या उंच उडीतील अंतिम फेरीत प्रवेश केला असून आणखी 13 स्पर्धंकांनी अंतिम फेरी गाठली. चेतनने 2.05 मीटर उडी मारून सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर त्याने 2.15 मीटर उडी मारल्याने त्याचे अंतिम फेरीत स्थान पक्‍के झाले. या स्पर्धेत 2.20 मीटर पात्रता मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र तेवढ्या उंचीपर्यंत एकाही खेळाडूला उडी मारता आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान महिलांच्या हातोडा फेक प्रकारात भारताच्या सरिता रोमिता सिंगने 62.03 मीटर फेकीसह पाचवे स्थान पटकावल्याने थोडक्‍यात पदक गमावले. तर दुती चंदने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत पहिले स्थान पटकावताना आपल्या गटातून उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तसेच भारताचा श्रीशंकर हा लांब उडी प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून त्याने 7.83 मीटर उडी घेत पात्रता फेरी पार केली. भारताच्या हिमा दासने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीतील पात्रता फेरीत 51.00 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावताना पुढील फेरीत आगेकूच केली. तसेच निर्मला शेवराननेही याच शर्यतीत 54.09 सेकंदांत उपान्त्य फेरी गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)