मोहमद शमीच्या पत्नीने घेतली ममता बॅनर्जी यांची भेट

कोलकाता : आरोपांमुळे वादात सापडलेल्या मोहमद शमी याची पत्नी पत्नी हसीन जहां हिने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तिने शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे.

शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीनने शारीरिक व मानसिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच मुख्यमंत्री ममता यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हसीनची विधानभवनात भेट घेतली. येथे त्यांची साधारणपणे १० मिनिटे बैठक झाली. यावेळी आपण या प्रकरणात नक्की लक्ष घालू, असा विश्वास ममता यांनी हसीनला दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)