मोहन भागवत यांचा बिहारमध्ये दंगल घडवून आणण्याचा कट – तेजस्वी यादव

पाटणा:  सरसंघचालक मोहन भागवत यांना  रामनवमीच्या काळात बिहारमध्ये दंगल घडवून आणायची होती, असा आरोप लालू  पुत्र तेजस्वी यादव यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यांनी म्हटले की,  मोहन भागवत यांनी रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा कट आखला होता. भागवत नुकतेच 14 दिवसांसाठी बिहारमध्ये येऊन गेले. या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय.

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये धार्मिक तंट्यांमुळे तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे रामनवमीनंतरच या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भागलपूर, औरंगाबाद, नालंदा, समस्तीपुर आणि नवादा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आज सकाळीच नवादा येथे हिंसक आंदोलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान  तेजस्वी यादव यांच्या या आरोपांवर संघ काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)