मोहननगर येथे सात वाहनांची तोडफोड

पिंपरी – चिंचवड येथील मोहननगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या चार चाकी गाडयांची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.12) मध्यरात्री घडली. यामध्ये सुमारे सात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

तीन जणाच्या टोळक्‍यांनी हातातील कोयत्याच्या सहाय्याने ही तोडफोड केली आहे. पिंपरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असून तोडफोड करणा-यांची पोलिसांना ओळख ही पटली आहे.

मध्यतंरी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मिशन ऑल आउटमुळे तोडफोडीच्या घटना नियं6णात आल्या होत्या मात्र पुन्हा तोडफोडीचे सत्र वर तोंडकाढत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)