मोहननगरचा तलाव 10 महिन्यांपासून बंद

तलावायन भाग – 8

पिंपरी – मोहननगर येथील राजर्षी शाहु महाराज जलतरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल 10 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. हा तलाव ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळेच बंद असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मात्र 10 महिन्यांपासून बंद ठेवूनही तलावाच्या दुरुस्तीची कामे ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे आजही पुर्ण झालेली नाहीत. अर्धवट राहिलेली कामे पुर्ण करुन लवकरात लवकर तलाव सुरु करावा अशी मागणी जलतरणप्रेमींनी केली आहे.

-Ads-

सर्वच विभागांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागच्या 10 महिन्यापासून तलाव बंद ठेवण्यात आला आहे. मात्र तलावातील फिल्ट्रेशन करण्यात आलेले नाही. तसेच अजूनही विद्युत व्यवस्था केलेली नाही. कामाच्या नावाखाली ठेकेदारांकडून निव्वळ महापालिकेची व नागरिकांची दिशाभूल केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या जलतरण तलावाची क्षमता एकावेळी 150 ते 200 लोक पोहू शकतील एवढी आहे. जलतरण तलाव उन्हाळ्याच्या हंगामात महापालिकेला उत्पन्न देणारा स्त्रोत असतो. तोच तलाव बंद असल्याने महापालिकेचे उत्पन्न यंदा बुडाले आहे. त्यामुळे केवळ ठेकेदाराच्या चुकीच्या कारभाराचा फटका पालिकेच्या उत्पन्नाला बसत असल्याचे मत नागरिकांनी मांडले आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे तलाव बंद पडला असून ठेकेदारांच्या कारभारामुळे मागच्या काही दिवसांमध्ये या जलतरण तलावाची दूरवस्था झाली आहे.

तलाव परिसरात अस्वच्छता दिसून आली. तसेच येथे पाणी शुद्धीकरणासाठी एकच मोटार बसवले गेली असल्यामुळे फिल्ट्रेशनचे काम संथगतीने होते. त्यामुळे येथे पाणी शुद्धीकरणासाठी आणखी एका मोटारीची गरज आहे. तर ठेकेदार कामाचे वेळेवर पैसे देत नाहीत. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्यामुळे तलावाची कामे संथ गतीने सुरु असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच येथे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी असलेल्या फिल्ट्रेशन मशीनसाठी लागणारा गॅस ठेकेदाराने पुरवलेला नाही. त्यामुळे केवळ पाणी शुद्धीकरणाअभावी हा जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे अपुर्ण राहिलेली कामे त्वरीत पुर्ण करुन हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी जलतरणप्रेमींनी केली आहे.

तलावाच्या कार्यालयाच्या खिडक्‍यांच्या काचांवर काही टवाळखोरांनी दगडफेक केली आहे. या फुटलेल्या काचा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली मागच्या 10 महिन्यांपासून तलाव बंद ठेवूनही ही सर्वकामे पुर्ण का झाली नाहीत, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी ठेकेदार वेळकाढूपणा करत आहे. मात्र त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून ठेकेदाराच्या चुकीमुळे तलाव बंद राहिल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर अर्धवट कामे पुर्ण करुन तलाव येत्या 1 तारखेपासून सुरु करण्यात येणार असल्याचे तलाव व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

नागरिकांच्या मागण्या
– जलतरण तलाव लवकरात लवकर खुला करावा
– तलावाची खोली लक्षात घेता येथे 4 जीव रक्षकांची नेमणूक करावी
– उन्हाळ्याची गर्दी लक्षात घेता येथे आणखी 2 सुरक्षा रक्षक नेमावेत
– जलतरण तलावाची नियमीत स्वच्छता करावी
– संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)