मोसंबीचा “गोडवा’ वाढला

हंगाम बहरला : ग्राहकांकडून मागणी वाढली


80-100  टन आवक

पुणे- आंबट-गोड चवीच्या मोसंबीचा हंगाम यंदा चांगलाच बहरला आहे. रविवारी येथील मार्केटयार्डात तब्बल 80 ते 100 टन इतकी आवक झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असून त्या तुलनेत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी भाव घसरले आहेत.
मोसंबीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. तेव्हापासून आंबूस चवीची मोसंबी बाजारात येत होती. मात्र, मागील आठवड्यापासून फळाची गोडी वाढली आहे. आकाराने मोठी, रंगाने पिवळी मोसंबी बाजारात येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून या मालाची आवक होत आहे. तीन डझनास 90 ते 220 रुपये, तर लहान आकाराच्या 4 डझनास 20 ते 80 रुपये भाव मिळत आहे. ज्युस विक्रेते, स्टॉलधारक तसेच घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, असे मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.

मार्केटयार्डात अहमदनगर जिल्ह्यातून संत्र्यांची आवक होत आहे. रविवारीदेखील 50 टन आवक झाली. येत्या काही दिवसांत संत्र्यांची गोडी वाढेल. त्यानंतर मागणी आणि भावामध्ये वाढ होईल.
– सोनू ढमढेरे, संत्रा, मोसंबी व्यापारी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)