मोशी प्राथमिक विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम

मोशी- विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणाचा विकास व्हावा, या हेतूने मोशी येथील प्राथमिक विद्यालयात वर्षभरामध्ये गोकुळाष्टमी, भोंडला, क्रीडा स्पर्धा चित्रकला निबंध, वक्‍तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक वसंत बोराटे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते. क्रीडा स्पर्धामध्ये बक्षीस मिळालेल्या विध्यार्थ्यांचे कौतुक धनंजयं आल्हाट यांनी केले. विद्यार्थ्यानी मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

महापौर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत, उपस्थितांची वाहवा मिळाली. सुनिता गवारे यांनी प्रस्ताविकात शाळेविषयी माहिती दिली.
बाळकृष्ण डहाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी वृषाली जाधव संदीप भोते, उज्ज्वला तांबडे, आशिष शिंदे, लतिका तळपे, दत्तात्रय बुरुडे, विकास कामठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)