मोशी कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेचे चार आगीचे बंब प्रयत्न करत होते. मात्र, आग भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याला मर्यादा येत होत्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोशीत महापालिकेचा कचरा डेपो असून, शहरात गोळा होणारा कचरा या डेपोत टाकला जातो. उन्हामुळे कुजलेल्या कचऱ्याचा परिसरात दुर्गंधी सुटत असते. रात्री आठच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे चार बंब तत्काळ घटनास्‌थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करुनही आगीवर नियंत्रण मिळविता येत नसल्याचे चित्र पहायला मिळाले. या आगीने रौद्र रुप धारण केल्याने पुणे-नाशिक महामार्गावरूनही भीषण आग व धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाचे सर्व विभागातील अधिकारी मदतीला धावले आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची घटना दुर्दैवी आहे. अशी घटना का घडली? आणि यापुढे कधीही घडू नये, याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, महापालिकेच्या पुढाकाराने वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यासाठी गती देण्यात येणार आहे. आगामी दीड ते दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)