मोशीत 3 पिस्तूल, 12 जिवंत काडतूस जप्त

पिंपरी – बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मोशी येथे सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 12 जिवंत काडतूस असा एकूण 92 हजार 400 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

मोहन संतोष कोळी (वय-21, रा. सिद्धी आर्केट मागे, चाकण) आणि राम प्रसाद संतोष सोळंकी (वय 19, रा. ढोकलोक, भगवनपूर, खरनोग, मध्य प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

एकजण पिस्तूल विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मोशी टोलनाका परिसरातील इंद्रायणी हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नवनाथ पोटे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहनला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतूस मिळाले. त्याच्या अटक करून पोलिसी खाक्‍या दाखवल्या असता त्याने परराज्यातील साथीदार सोळंकी हा एमआयडीसी भोसरी हद्दीत पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सोळंकी याला सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. दोघांकडून पोलिसांनी एकूण 92 हजार 400 रुपये किमतीच्या तीन पिस्तूल व बारा जिवंत काडतूस हस्तगत केली.

उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे, सतीश नांदूरकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक रावसाहेब वांबळे, श्रीकांत शेडगे, सुरेश चौधरी, रवींद्र तिटकारे, संदीप भोसले, संजय भोर , किरण काटकर, नवनाथ पोटे, विजय दौडकर, प्रसाद कलाटे, करण विश्वासे, विशाल काळे, अमोल निघोट या पथकाने कामगिरी केली.

रॅकेट उद्धवस्त करण्याचे आव्हान
पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे मोठे जाळे पसरले आहे. पोलिसांकडून शहरातील विविध भागात कारवाई होत असताना दोन ते तीन दिवसाआड पोलिसांच्या जाळ्यात येणारे गुन्हेगार पाहता हे रॅकेट उद्धवस्त करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. परप्रांतिय गुन्हेगारांचा या क्षेत्रातील सराईत वावर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)