मोशीत वाहन चालकास मारहाण

पिंपरी – मोशी टोलनाक्‍याजवळ एका वाहन चालकाला लाथा बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 14) पहाटे तीनच्या सुमारास मोशी टोलनाका येथे घडली.

खंडेराव माधव अभंगे (वय-27, रा. निघोजे, डोंगरवस्ती, खेड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अनिल प्रल्हाद देशमुख, विठ्ठल पवार (दोघेही रा. गायकवाड वस्ती, मोशी) आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेराव एका खासगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. शनिवारी पहाटे ते कंपनीकडे जात असताना मोशी टोलनाक्‍याजवळ लघुशंकेसाठी थांबले. दरम्यान अनिल, विठ्ठल आणि अन्य एका साथीदाराने येऊन त्यांना दम देण्यास सुरुवात केली. तसेच खंडेराव यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण देखील केली. खंडेराव यांच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)