मोशीत वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू

मोशी – अज्ञात वाहनाखाली सापडून एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी मोशी येथे घडली.

बाळू सयाजी वैरागर (वय-40, रा. उत्तर लक्ष्मीनगर, आळंदी रोड, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मोशी येथील एका हॉटेलजवळ वैरागर हे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, वैरागर यांच्या अंगावरून एखादे चारचाकी वाहन गेले असावे, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)