मोशीतील प्रदर्शन केंद्रात शौर्यस्मारकाचा प्रस्ताव

पिंपरी – मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात भोपाळप्रमाणे शौर्यस्मारक उभारण्याचा प्रस्ताव प्राधिकरण सभेत मांडला आहे. यावेळी पीएमपी, पोलीस चौकी, अग्निशामक दल यांना जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शौर्यस्मारकाबाबत माहिती घेतली जाईल. त्यासाठीच्या खर्चाचा अंदाजपत्रकात समावेश केला जाईल असे सांगून सभेपुढे मांडण्यात येईल, अशी सूचना म्हैसकर यांनी केली.

एका पोलीस चौकीसाठी 250 चौरस मीटर, महापालिकेच्या नुसार अग्निशामक केंद्रासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रहिवासी दराच्या पंचवीस टक्के अधिमूल्य घेऊन पीएमपीच्या सहा थांब्यासाठी जागा मंजूर करण्यात आल्या. त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्त्यामुळे बाधित कुटंबीयांच्या पुनर्वसनाकरीता महापालिकेने सेक्‍टर आकरामध्ये मागणी केलेला 73 गुंठ्यांचा भूखंड 9 कोटी 60 लाख रूपये भरून घेऊन महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय सभेने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)