मोशीतील पादचारी पूल बनला मद्यपींचा अड्डा

मोशी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील पादचारी पूल टवाळखोर, मद्यपींसाठी दारू पिण्याची हक्काची जागा झाली आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत, त्यामुळे भर चौकालगत “ओल्या पार्ट्या’ रंगत आहेत.

मोशीतील मुख्य चौकात पोलीस स्टेशन असून, या चौकापासून हाकेच्या अंतरावर सर्वसामान्य नागरिकांसाठी दोन पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलाचा वापर बोराटे आळी, गावठाण, तसेच नागेश्‍वर नगर आणि नागेश्‍वर विद्यालयात ये-जा करण्यासाठी नागरिक करत आहे, तसेच या पुलावरून रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले चालण्यासाठी येत असे; परंतु सध्या या पुलावरून दिवसा देखील चालणे मुश्‍कील झाले असून, पुलावर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या, ग्लास आढळून येतात. यात काही बाटल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. या पुलाचा वापर सध्या मद्यपींकडून होत असून रात्रीच्या वेळी बिनदिक्कत या पुलावर ओल्या पार्ट्या रंगत आहेत. त्यामुळे या भागातून महिलांना ये-जा करणे धोक्‍याचे ठरत असल्याचे येथील महिलावगाची तक्रार आहे. परिणामी या पूलाऐवजी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडण्याची महिला रिस्क घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पादचारी पुलापासून मोशी पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. संध्याकाळी या पुलावर मद्यपी बसलेले असतानाही पोलिसानांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची तसदी घेतली जात नाही. सर्वसामान्य नागरिक, महिला वर्गाला होणाऱ्या या त्रासाची दखल घेऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)