मोलकरणीने  30 तोळे सोन्याचे दागिने चोरले

 

पुणे,दि.5
घरकाम करणाऱ्या महिलेने सोसायटीतील दोन सदनिकांमधून तब्बल 30 तोळे सोन्याचे दागिने चोरले. या दागिण्यांची किंमत 5 लाख 98 इतकी आहे. या महिलेला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. तीच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात येत आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
नलिनी साष्टे (रा.सनसिटी) असे अटक केलेल्या मोलकरीण महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रिती गिरीधर करंदीकर (38 ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही स्वयंपाकी म्हणून काम करते. ती फिर्यादी करंदीकर यांच्या घरी जून 2018 पासून काम करीत होती. फिर्यादींनी त्यांचे वडिलोपार्जित दागिने कपाटात ठेवले होते. त्या कपाटाला कुलून लावण्यास विसरल्या होत्या. ही बाब मोलकरणीच्या लक्षात आल्यानंतर तीने मागील दोन ते तीन महिन्यापासून त्यातील थोडे थोडे दागिने चोरण्यास सुरवात केली.मंगळवारी सकाळी फिर्यादी या घर आवरत असताना त्यांनी कपाट तपासले असता त्यामध्ये ठेवलेले 22 तोळे दागिने चोरिला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण ही सोसायटीमधील शेजारच्या घरातही काम करीत होती. फिर्यादीने शेजारच्यांना ही बाब सांगितले तेव्हा त्यांनीही घरातील 7 ते 8 तोळे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीने सिंहगड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांनी मोलकरणीवर संशय व्यक्त केल्याने तीला ताब्यात घेऊन पोलिशी खाक्‍या दाखवण्यात आला. यानंतर तीने दागिने चोरल्याची कबुली दिली.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गिरीष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने फिर्यादी महिलेच्या घरी काम करणाजया मोलकरीण महिलेस ताब्यात घेतले. तीच्याकडे तपास केला असता तीने दोन्ही घरात दागिने चोरल्याची कबूली दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)