मोरोशीत रामजन्मोउत्सव उत्साहात

राजगुरूनगर- मोरोशी (ता. खेड) येथे श्रीराम नवमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामजन्मनिमित्ताने परिसरातील रामभक्‍तांनी मोठी गर्दी केली होती. मोरोशी येथे गेल्या अनेक वर्षांपासून रामजन्माचा उत्सव भरविला जातो. गावातील रामजन्म व काळभैरवनाथ देवाची यात्रा आज भरविण्यात आली होती. यानिमित्ताने बबन महाराज शिंदे (भोसरी) यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी बारा वाजता रामजन्म उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने गावातील वृद्ध महिलांनी श्रीरामाचा पाळणा गायन केले. त्यानंतर प्रभुरामचंद्राची प्रतिकृतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या यात्रेचे नियोजन मधुकर कोकणे, तान्हाजी पन्हाळे, काळूराम नांगरे, महादू सुतार, राजू सुतार, राजू नांगरे, प्रकाश तिटकारे, बाळू नांगरे, महेश नांगरे, सुभाष मडके,अक्षय सोनवणे, पोलीस पाटील रोहिदास नांगरे, मारुती भांगे, जिजाभाऊ नांगरे, संतोष सुतार, शंकर नांगरे, महादेव नांगरे, भरत नांगरे, यांच्यासह ग्रामस्थानी केले होते. रामनवमीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहात प्रसिद्ध महाराजांची कीर्तने, प्रवचने झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)