मोराचा संशायस्पद मृत्यू

  • तिन्हेवाडी, सांडभोरवाडी वन हद्दीतील घटना

राजगुरूनगर – येथील तिन्हेवाडी, सांडभोरवाडी परिसरातील वन विभागाच्या हद्दीत मोर मृतावस्थेत आढळला असून त्याचा मृत्यू नक्की कशाने झाला याबाबत मात्र, शोध लागला नसल्याने मोराच्या मृत्यूबबत संशय व्यक्‍त केला जात आहे.
तिन्हेवाडी गावाच्या हद्दीत इंदिरा पाझर तलावावरील रस्त्या लगतच्या जंगलाला वणवा लागला आहे. या ठिकाणी स्वामीसमर्थ मंदिर, सटवाई मंदिरापासून पुढे आत जंगलात मृतावस्थेत मोर आढळला आहे. या परिसरात जंगलाला वणवा लागल्याने आगीत येथील झाडे-झुडपे जळून गेली आहेत. अख्खा परिसर वणव्याने जळून गेल्याने मोरांचे अस्तिवच धोक्‍यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी येथे जळालेल्या जंगलाच्या ठिकाणी एक मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, मोर मृतावस्थेत सापडल्याने त्याला कोणी मारून टाकले का, अन्न पाण्याविना त्याचा मृत्यू झाला याबाबत माहिती पुढे आली नाही. मात्र येथे असलेल्या सुमारे 700 ते एक हजार मोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न मात्र निर्माण झाला आहे.
तिन्हेवाडी सांडभोरवाडीच्या वनविभागाच्या जंगलात सुमारे सातशे पेक्षा जास्त मोर वास्तव्य करीत आहेत. मात्र आता उन्हाळा सुरु झाल्याने त्यांना अन्न पाणी चारा मिळणे अशक्‍य होवू लागले आहे. त्यातच काही भाग आगीच्याभक्षस्थानी झाल्याने त्यांना राहण्यासाठी मोठी अडचण झाली आहे. मोरांची भंटकंती सुरु झाली आहे, डोंगरदऱ्या व मोकळ्या माळरानांवर फिरत आपला चारा शोधत हे मोर दिवभर भटकंती करत आहे त्यातच उन्हाचे चटके त्यामुळे या मोरांचे जनजीवन धोक्‍यात आल्याचे गावाकरी सांगतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)