मोरया संजीवन समाधी महोत्सव 17 डिसेंबरपासून

पिंपरी – महान गणेशभक्त श्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांचा 457 वा संजीवन समाधी महोत्सव 17 ते 27 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, राकेश चौरसिया, शरद पोंक्षे हे महोत्सवाचे आकर्षण आहेत. “आपलं घर पुणे’चे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना या वर्षीचा “श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेवक करूणा चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. सोमवारी (दि. 24) सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते होईल. सकाळी सात वाजता शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण, दुपारी दोन वाजता आरोग्य व दंत चिकित्सा व मोफत औषधे वाटप शिबीर, सायंकाळी पाच वाजता शंकर शेवाळे महाराज यांचे “श्री चिंतामणी महाराज व श्री तुकाराम महाराज भेट’ या विषयावर व्याख्यान, रात्री आठ वाजता सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा “आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. 25) सकाळी सात वाजता संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे सामुहिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी नऊ वाजता सामूहिक महाभिषेक, रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांचे “दहशतवाद, भारतासमोरील एक आव्हान’ यावर व्याख्यान होणार आहे. रात्री आठ वाजता रघुनंदन पणशीकर आणि सहकलाकारांचा अभंग, भक्तिगीत व नाट्यपदांचा कार्यक्रम होईल.

बुधवारी (दि. 26) सकाळी काकड आरती, महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन, वैद्यकीय शिबीर होईल. तर सायंकाळी साडेपाच वाजता शरद पोंक्षे यांचे “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. रात्री नऊ वाजता बासरीवादक राकेश चौरसिया, तबला वादक विजय घाटे आणि पखवाज वादक भवानी शंकर यांची जुगल बंदी होईल. गुरुवारी (दि. 27) मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक करून सकाळी सात वाजता भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)