“मोरया वॉरिअर्स’ ठरला अजिंक्‍यपदाचा मानकरी

आळेफाटा- जुन्नर प्रीमियर लीग (जेपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निमगाव सावा येथील “मोरया वॉरियर्स’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावून तो अजिंक्‍य ठरला असल्याची माहिती संयोजक संदिपान पवार आणि अविनाश मते यांनी दिली. विधानसभेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके आणि जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पांडुरंग स्पोर्ट्‌स क्‍लब,संकल्प युवा ग्रुप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि ग्रामस्थ यांच्या वतीने निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
या विजेत्या संघांना 75,555 (प्रथम), 55,555 (द्वितीय), 35,555 (तृतीय), 25,555 (चतुर्थ) रुपये रोख रक्कम व चषक अशा स्वरूपाचे बक्षीस वितरण बारामती ऍग्रोचे सीईओ रोहित पवार आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, सरपंच सुनीता घोडे, सुवर्णा गाडगे, इब्राहिम पटेल, संतोष गाडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, उद्योजक किशोर दांगट, मुक्ताई डेअरीचे मालक व बोरी खुर्द गावचे उपसरपंच कलास काळे, एम. डी. घंगाळे, राजाभाऊ मुळे, विवेक काकडे, परशुराम लगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रघुनाथ लेंडे, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, गुलाब नेहरकर, संभाजी चव्हाण, भानुदास हाडवळे, जगन दाते, धोंडीभाऊ पिंगट, सुरेश तिकोणे, तांबेवाडीचे सरपंच तान्हाजी कुंजीर, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, विविध संघांचे संघमालक, खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

  • अनुक्रमे विजेते चार संघ
    या स्पर्धेत प्रथम चार क्रमांकात विजयी झालेले संघ पुढीलप्रमाणे मोरया वारियर्स – निमगाव सावा (प्रथम), नवी मुंबई स्पोर्ट्‌स क्‍लब – बोरी, वडगावआनंद (द्वितीय), एस. के. सुपरकिंग – बेल्हे ,बोरी, कोंबरवाडी, पारगाव (तृतीय), तर श्री धर्मनाथ स्पोर्ट्‌स क्‍लब युनिट 7 – साकोरी, औरंगपूर (चतुर्थ).

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)