मोरडेवाडी शाळेतील 17 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील मोरडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आला आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी मोरडेवाडी शाळेतील दिक्षा गवारी व श्रद्धा विश्वकर्मा यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. इयत्ता पाचवीतील आदित्य मोरडे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आठवा आला आहे. तर एकूण 17 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे – आदित्य मोरडे, दीक्षा गवारी, स्वामिनी भालेराव, सिमरन मुंडे, श्रद्धा विश्वकर्मा, सुजल मोरडे, श्रावणी बोनवटे, प्रमोद दगडे, तमन्ना शेख, वैष्णवी गवारी, सुशांत मोरडे, प्रथमेश पाटील, गोरक्ष मोरडे, अथर्व भंडारी, श्रेयस मोरडे, अश्विनी ढमढेरे, कृष्णा खरड. सर्व विद्यार्थ्यांना गणेश वामन व नंदकुमार चासकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शिलेंद्र चिखले, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, जिल्हा परिषदच्या सदस्या अरुणा थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू मोरडे, प्रशांत मोरडे, दत्तू मोरडे, बबन मोरडे, दिनेश मोरडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, धनेश मोरडे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)