मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील मोरडेवाडी- मंचर येथील बालविजय गणेश मंडळाची सुमारे 17 फूट उंचीची आकर्षक गणेश मुर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मंचर शहरात बुधवारी रात्री गर्दी केली होती. यावेळी भाविक भक्तांसह गणेशमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गुरुवारी सायंकाळी विधीवत पुजा करुन गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली. मोरडेवाडी येथील गणेशमूर्ती ट्रॅक्‍टरवर विराजमान करून मंचर बसस्थानकाजवळून पुणे-नाशिक हमरस्ता, पिंपळगाव चौक, शिवाजी चौक, पोलीस ठाणे मार्गे मोरडेवाडी येथे नेऊन विधीवत स्थापना करण्यात आली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरडे यांनी दिली. चिंचपोकळी मुंबई येथून मोरडेवाडी मंचर येथे 17 फूट उंचीची गणेशमूर्ती आणण्यासाठी सुमारे 24 तास वेळ लागला.

मंडळाचे यंदाचे 33वे वर्ष असून गणेशोत्सव कार्यक्रमात कीर्तन कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 17 फूट उंचीची सर्वात मोठी गणेशमूर्ती पुणे जिल्ह्यात बालविजय गणेशमंडळाची असल्याचा दावा मंडळाने केला आहे. गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांसह तरुण कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)