मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस…

दरवर्षी मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये नवीनतम तंत्रज्ञानाच्या ट्रेंडचा खुलासा होत असतो. सामान्यपणे फेब्रुवारीमध्ये जीएसएमए मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस असते परंतु कधीकधी हा शो मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतो. मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस बार्सिलोना स्पेनमधील फिरा ग्रीन वाय येथे आयोजित केले जाते. MWCला दरवर्षी साधारणत: 100,000 पेक्षा जास्त लोक भेट देत असतात. जगभरातील 200 पेक्षा जास्त देश उपस्थित असतात.

जीएसएमए मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस 2018 बार्सिलोनामध्ये 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2018 दरम्यान पार पडली. 2011 मध्ये, अशी घोषणा करण्यात आली की बार्सिलोना, स्पेनला जीएसएमए मोबाईल वर्ल्ड कॅपिटल म्हणून निवडण्यात आले आणि 2023 पर्यंत जीएसएमए मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस इथेच भरवले जातील. यंदाच्या MWC चे मुख्य आकर्षण 5G, VR(व्हर्चुल रिअलिटी), AI(artificial intelligence) हे होते. सध्याच्या आघाडीच्या मोबाईल उत्पादकापैकी काही उत्पादकांनी आपले नवीन उत्पादने या प्रदर्शनात मांडली. प्रदर्शनात कनेक्‍टेड कार, व्हर्च्युअल रिअललिटी, नवीन हॅंडसेट आणि कल्पक ऍप कल्पना, 3D प्रिंटींग, प्रायव्हसी संरक्षण आणि बॅकएंड सोलुशन सर्व काही प्रदर्शित झाले होते. MWC ला भेट दिलेल्या प्रत्येकांनी आज जगातल्या सर्वात अत्याधुनिक मोबाइल सक्षम उत्पादने आणि सेवांबद्दल प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. हे वर्षांच्या मोठ्या स्मार्टफोन्ससाठी सुरू होणारे प्लॅटफॉर्म आहे, पण अलिकडच्या वर्षांत यामध्ये टॅब्लेट आणि इतर कनेक्‍टेड डिव्हाइसेसची श्रेणीदेखील आहे. अगदी “टू इन वन’ टॅबलेट यांचाही समावेश होता. samsung galaxy S9, asus zeofone5, nokia 8,8110, LG V30 असे बरेच मोबाईल या ठिकाणी लॉच झाले. अधिक माहिती साठी https://www.mobileworldcongress.com/ या संकेतस्थळावर भेट द्या. आशियाई मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस, शांघाय आशियातील उद्योग कार्यक्रम 27-29 जून 2018 रोजी होणार आहे. तसेच भारत मोबाईल कॉंग्रेस – ऑक्‍टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

– प्रशांत खोत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)