मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

पुणे – पादचारी व्यक्तीचा मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे.

अभिजीत महादेव कांबळे (वय 19, रा.मांजरी), अभिजीत नामदेव यादव (वय 19, मांजरी. मूळ रा. करमाळा) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अंकुश शंकर चव्हाण (वय 22, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 8 जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास वाघोली येथील एका दुचाकीच्या शोरूमच्या पाठीमागे घडला. अंकुश चव्हाण हे कामावरून पायी घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील 9 हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोकड जबरदस्तीने घेतली. तिघे तेथून फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)