मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमुळे निद्रानाश (भाग 1)

डॉ. राजेंद्र माने

निद्रा ही जरी नैसर्गिक शारीरिक गरज असली तरीही गेल्या काही वर्षात त्याचं महत्त्व कमी झालं आहे. जनसामान्यांत त्याबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. त्यावर सत्तरच्या दशकापासूनच सिनेमाची गाणे, झोप न येणे हे किती आनंददायी व प्रतिष्ठेचं आहे असे दर्शवितात. म्हणूनच निद्रा महत्त्वाची आहे असं वाटतच नाही. त्यातच अजून भर म्हणून गेल्या दशकात सोशल मीडिया व मोबाईल स्क्रीनमुळे निद्रानाश होतेय.

झोप ही अति निकडीची शारीरिक गरज आहे. नियमित व्यायाम व पौष्टिक आहार ह्यांच्याहीपेक्षा झोप महत्त्वाची आहे कारण जर शरीरास आराम नसेल तर आहार व व्यायाम करूनही त्या मदतनीस ठरू शकणार नाहीत. हल्ली लहान मुलांमध्येही झोपेचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जुनी बालकं जास्त काळ झोपायचे ती झोपेची मात्रा नवीन बालकात कमी झालेली आहे. बदलते दळणवळण, आवाज टेलिव्हिजन व मोबाईल ह्यास कारणीभूत दिसतात. पण एका संशोधनात धक्कादायक माहिती आहे की पालकांचे मुलांच्या झोपेबद्दलचे दृष्टिकोन हे मुलांच्या कमी झोपेस कारणीभूत आहे. म्हणजेच पालकांचा असे म्हणणे आहे की मूल कमी झोपले तर चालेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झोप ही नावीन्यतेची सुरुवात आहे. ऊर्जात्मक होण्याचा मार्ग आहे. व्यवस्थित झोप झाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आठवणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत होते. शारीरिक जखमा लवकर भरून निघतात. भुकेचे हार्मोन्स योग्य प्रमाणात स्त्रवतात आणि आहार नियमित होतो म्हणून वजन वाढत नाही. व्यवस्थित झोपेमुळे ऍथलेटिकच्या खेळातील कामगिरी व अचुकता वाढलेली आहे. (पबमेड संशोधन) निद्रानाशाचे दुष्परिणाम तर आपणास परिचितच आहेत. अपूर्ण झोपेमुळे ब्रेनची स्तिथी ही मद्दपान केलेल्या व्यक्तीसारखी होते. बुद्धीची कार्यप्रणाली मंदावते. चुका होतात. कमी झोपेमुळे डायाबेटिस व ब्लड प्रेशरची बिमारी होते. संशोधनात हे आढळले की निद्रानांशामुळे ब्रेन ऍटॅक व हार्टअटॅकही होऊ शकतो. वेस्टनार्झेशनमुळे आपल्या झोपेच्या वेळा रात्री उशिरा होत चालल्या आहेत. ते ही शरीरास हानिकारक असते.

आधुनिक काळात प्रौढात कामाच्या तणावामुळे पुरेशी झोप होत नाही तर विद्यार्थ्यांत शालेय वेळेमुळे ही अपूर्ण झोप होतेय. अपूर्ण झोपेची तीन मुख्य कारणे आहेत. ती म्हणजे आजार, आपत्ती व आदत. आजार व आपत्तीचा आढावा नंतर घेऊ. आदत ही कशी बदलत आहे हे आपण थोडक्‍यात वर वाचलेले आहे. झोपेच्या चांगल्या सवयी (डश्रशश किरलळीीं) निर्माण करणे गरजेचे आहे. झोपण्याचे व उठण्याची वेळ ही निश्‍चित करा. काहीही कारणासाठी ते बदलणे शक्‍य तेवढे टाळा. अभिनेता अक्षय कुमार हे फार कटाक्षाने पाळतो. मोबाईल, लॅपटॉप व टेलिव्हिजन हे निद्रानाशाचे प्रमुख कारण दिसते, त्यामुळे ते रात्री 8 नतंर वापरणे टाळा. त्यांच्या स्क्रिन लाइटने ाशश्ररीेंपळप नावाचे निद्रेस उपयुक्त असलेले हार्मोन कमी होते. तसेच अति रोमांचक वाचन केल्याने ब्रेनमधील भीतीशी निगडीत हार्मोन्स स्त्रवतात. तसे वाचन झोपण्यापूर्वी नको.

झोपण्यापूर्वी 3-4 तास अगोदर हेव्ही व्यायाम नको. लाइट व्यायाम केल्यास हरकत नाही. हेव्ही व्यायाम व हेव्ही खाणे यामुळे निद्रानाश होतोच. झोपण्याअगोदर शॉवर घ्यावे त्याने अंग रिलॅक्‍स होते व झोपेस मदत होते. स्वच्छ बेडशीट, सैल कपडे ठेवल्यास झोप शांत येते व बेडचा वापर फक्त झोपण्यासाठी करावा. त्यावर बसून पेपर वाचणे, जेवणे व गप्पा मारणे टाळावे, जेणेकरून बेड म्हणजे झोपणे असे ब्रेनचे समीकरण डोक्‍यात पक्क होतं. चहा, काफी व मद्य हे झोपेच्या 4-6 तास अगोदरच घ्यावे नाही तर झोपेची क्वालिटी खराब होते. नवीन संशोधनानुसार, प्रत्येकाचे पांघरून वेगळे वेगळे असावे त्याच्या ओढाताणामुळे निद्रानाश नको.
वरील सवयी दर्जेदार झोपेसाठी गरजेच्या आहेत.

खरं म्हणजे बऱ्याच काही कारणांनी आपण झोपेचं महत्त्वच हरवून बसलो आहे. झोपला तो संपला’ ही म्हणण्याची वेळ गेली आहे. तर दर्जेदार झोपला तोच मौल्यवान जगला’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
झोप न झाल्यास तब्येतीवर परिणाम होतो. हा निद्रानाश वाढल्यास मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि शरीराची मोठी हानी होते, असे नवीन संशोधनात आढळले आहे. माणसाला पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक आहे. या विश्रांतीमुळे तो अधिक ताजातवाना होऊन चांगल्या प्रकारे काम करू शकतो. सध्या जगभरात झोप न येण्याची समस्या वाढत आहे. तसेच अपु-या झोपेमुळे कामावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. झोप न झाल्यास तब्येतीवर परिणाम होतो. हा निद्रानाश वाढल्यास मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि शरीराची मोठी हानी होते, असे नवीन संशोधनात आढळले आहे.

पेकिंग विद्यापीठ आणि पेनिसिव्हिनिया स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातील संशोधकांनी माणसांवर प्रयोग केले. तीन दिवसात झोपेची पूर्तता न झाल्यास माणसांच्या स्वभावावर परिणाम होऊ शकतात. अल्पकालीन झोप न झाल्यास त्याचा परिणाम मेंदूतील सिरटी-3′ या प्रथिनांवर परिणाम होऊ शकतात. हे प्रथिने मेंदूसाठी अधिक उपयुक्त असतात.
विविध पाळ्यांवर काम करणाऱ्या कामगारांवर यांचे प्रयोग करण्यात आले. या कामगारांच्या झोपेच्या वेळा अनिश्‍चित झाल्यावर त्यांच्यातील सिरटी-3′ प्रथिनांचे प्रमाण कमी होऊ लागले. तसेच मेंदूतील मरणाऱ्या पेशींची संख्या वाढू लागली. शरीराची झीज कमी करण्यासाठी झोप अत्यावश्‍यक आहे. हे संशोधन न्यूरोसायन्सच्या जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमुळे निद्रानाश (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)