पिंपरी- पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने केली.
सोमनाथ बाळासाहेब लबडे (वय 20, रा. भोसरी), हृषीकेश शिवाजी मोहिते (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर गार्डन जवळ, भोसरी), गौरेश गिरीश नाईक (वय 20, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) यांना अटक केली आहे. मोबाईल हिसकावून घेणारी एक टोळी शहरात सक्रीय झाली होती. तपासी पथकाला पिंपरी पोलीस ठाण्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सोमनाथ भोसरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सोमनाथला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हृषीकेश आणि गौरेश यांच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. तिघांनाही अटक करण्यात आली. तिघांकडून वेगवेगळ्या कंपनींचे सहा मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)