मोबाईल चोरणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीचा कर्मचारी अटकेत

संग्रहित छायाचित्र ...

पुणे – नागपूरसाठी पाठवलेले 35 मोबाइलचे पार्सल ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने लांबविल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला येरवडा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला दि. 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रीस नितीन तेलनवार (वय 22, रा. सत्कार हॉटेलजवळ, खराडी – बायपास, मूळ रा. परभणी), असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी राहूल रतन वाधवानी (वय 31, रा. कांचन अर्पांटमेंट, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मोबाइल खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. त्यांना नागपूर येथील सीटी कलेक्‍शन या कंपनीची एमआय कंपनीच्या 35 मोबाइलची ऑर्डर मिळाला होती. त्यामुळे त्यांनी एसए मॉडेलचे 10 नग, ए 1 मॉटेलचे 20 नग आणि नोटफाईव्ह प्रो या मॉडेलचे 5 नग असे एकूण 35 मोबाइलचे पार्सल आरोपी काम करीत असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात 8 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता तेलनवाड याच्याकडे दिले.

मात्र, त्याने मोबाइल नागपुरला न पाठवला त्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून मोबाइल जप्त करण्यासाठी, त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)